नवीदिल्ली: आज हिंदी दिवस असून त्या बद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा देणारे एक ट्विट केलं आहे. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एक ट्विट करत शहांना टोला लगावला आहे.
Hindi isn’t every Indian’s “mother tongue”. Could you try appreciating the diversity & beauty of the many mother tongues that dot this land? Article 29 gives every Indian the right to a distinct language, script & culture.
India’s much bigger than Hindi, Hindu, Hindutva https://t.co/YMVjNlaYry
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) September 14, 2019
अमित शहा यांनी केलेल्या ट्विट नंतर ओवेसी यांनी म्हटले आहे की, हिंदी ही प्रत्येक भारतीयांची मातृभाषा नाही. तसेच आपण या देशातील अनेक मातृभाषातील विविधता आणि सौंदर्य यांची प्रशंसा करण्याचा प्रयत्न कराल का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच कलम 29 नुसार प्रत्येक भारतीयांना त्यांची वेगळी भाषा आणि संस्कृतीचा अधिकार आहे, असं म्हणत हा देश म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे असा टोला लगावला आहे.
भारत विभिन्न भाषाओं का देश है और हर भाषा का अपना महत्व है परन्तु पूरे देश की एक भाषा होना अत्यंत आवश्यक है जो विश्व में भारत की पहचान बने। आज देश को एकता की डोर में बाँधने का काम अगर कोई एक भाषा कर सकती है तो वो सर्वाधिक बोले जाने वाली हिंदी भाषा ही है। pic.twitter.com/hrk1ktpDCn
— Amit Shah (@AmitShah) September 14, 2019
दरम्यान शहा यांनी ट्विट करत भारत विविध भाषांचा देश असून प्रत्येक भाषांचे महत्व आहे. परंतु पूर्ण देशाची एक भाषा असणं आवश्यक आहे. तसेच देशाला एकजूट ठेवण्याचे काम सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी भाषाच करु शकते असे मत व्यक्त केले होते.