इंदापूर तालुक्यातील सर्व तलाव भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश…

इंदापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांची महाजानदेश यात्रा आज इंदापूर मध्ये असून, या यात्रेदरम्यान खडकवासला कालव्याच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील सर्व तलाव तात्काळ भरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांना दिले आहेत.

फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी झाले. यावेळी नुकतेच भाजपात प्रवेश केलेले राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या यात्रेचे उत्साहात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह मुर्तीचा फोटो भेट देण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महाजनादेश यात्रा हि तर नांदी आहे आपले प्रेम पाहून इंदापूरचा निकाल आजच लागला आहे. मागील पाच वर्षात अधीक जोमाने काम करून दाखविले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून ५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे सांगत विधानसभा विजयी करण्याचा निर्धार केला. तसेच इंदापूरकरांकडुन मागणी करण्यात आलेली उजनी उचल पाण्याची योजना तात्काळ मार्गी लावण्यात येणार असल्याचे श्वसनाची मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.