मुंबई – ‘कोरोना विषाणू’च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने जवळपास साडेतीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत.
दरम्यान, इतक्यात तरी चित्रपटगृह उघडण्याची शक्यता नसल्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते चित्रपट डिजिटल प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडत आहेत. यामध्ये आलिया भट्टचा आगामी ‘सडक-2’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Mark your calendars!
We are getting ready to bring you Rohit Shetty’s Sooryavanshi on Diwali and Kabir Khan’s 83 on Christmas THIS YEAR!! pic.twitter.com/bzPh8w4aqS
— INOX Leisure Ltd. (@INOXMovies) June 30, 2020
तर, दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगचा ’83’ हे दोन चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहेत. खुद्द INOX ने ही महत्त्वाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ आणि कबीर खान दिग्दर्शित ’83’ चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होतील. ‘ असं INOX ने म्हटलं आहे.