नॅनोचे उत्पादनही नाही आणि विक्रीही नाही

मुंबई: टाटा मोटर्सची नॅनो कार आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तीन महिन्यापासून नॅनोचे उत्पादन झालेले नाही. मार्च महिन्यात एकही नॅनो कार विकली नाही. टाटा मोटर्सने शेअर बाजारांना ही माहिती कळविली आहे. मात्र उत्पादन बंद करण्याचा कसलाही निर्णय घेतला गेलेला नाही, असे टाटा मोटर्सने म्हटले आहे.

याबाबत टाटा मोटर्सच्या प्रवक्‍त्याकडे विचारणा केली असता प्रवक्‍त्याने सांगितले की, सर्वसाधारण बाजारपेठेचा विचार करून कंपनीचे संचालक मंडळ अशा विषयावर निर्णय घेत असते. योग्य वेळी या विषयावर संचालक मंडळ निर्णय घेईल आणि तो माध्यमांना कळविला जाईल असे प्रवक्‍त्याने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.