बॉलीवूड अभिनेत्री श्रुती हसनचे म्हणणे आहे की, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला कोणती न कोणती किंमत ही मोजावीच लागते. श्रुती म्हणते, मला असे वाटते की, ज्या गोष्टीचा आपण त्याग करण्यास तयार असतो. तो आपला व्यक्तिगत निर्णय असतो. परंतु प्रत्येक प्रोफेशनमध्ये कोणत्या न कोणत्या गोष्टीचा त्याग हा करावाच लागत असतो.
बॉलीवूडमधील स्टार कपल कमल हसन आणि सारिका यांची मुलगी श्रुती म्हणाली, बहुतेक लोकांना आपल्या व्यक्तिगत जीवनात त्याग करावा लागतो. आपण जीवनात ज्या गोष्टींशी तडजोड करतो यात बहुतेक करून वेळ आणि नातेसंबंध असतात. मग आपण बॅंकेत काम करत असो किंवा चित्रपटात.
दरम्यान, श्रुतीने एक अभिनेत्री म्हणून काम करत 11 वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे. ती सतत स्वतःत बदल करण्यास प्राधान्य देत असते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या यारा चित्रपटात ती झळकली.
यात तिच्यासोबत विद्युत जामवाल, केनी बसुमतारी, विजय वर्मा आणि अमित साध यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तिग्मांशु धूलियाद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट गॅंग स्टोरी या फ्रेंच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.