पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत ज्या मतदारांची रंगीत छायाचित्रे नाहीत, त्यांनी तसे छायाचित्र निवडणूक शाखा हवेली तहसील किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावे, असे आवाहन नोंदणी अधिकारी सचिन बारवकर व तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी केले.
खडकवासला मतदारसंघात यादीमध्ये सुमारे 47 हजार मतदारांची छायाचित्रे नाहीत. नाव असूनही छायाचित्र नसणे, पूर्ण माहिती नसणे, पत्ता अद्ययावत करणे आदीबाबत कागदपत्रे जमा करावेत. अथवा www.nvsp.in या संकेतस्थळावर अर्ज नमुना नं. 8 भरावेत. ज्या मतदारांचे छायाचित्र आठ दिवसांत जमा होणार नाहीत अथवा ऑनलाइन अर्ज नमुना 8 मध्ये प्राप्त होणार नाहीत, अशा मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत.