… मग राहुल गांधींनी सांगावे राफेलवर काय लिहावे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा राहुल गांधींना सवाल

नवी दिल्ली : भारतीय लष्कराची ताकद वाढवणारे राफेल विमान नुकतेच लष्करात समाविष्ट करण्यात आले आहे. परंतू, या राफेल सोबत अनेक वाद सुरू आहेत. त्यातच भारताला मिळालेल्या पहिल्या राफेल विमानाची पूजा करताना मी त्यावर ओम लिहिले होते. काही जणांनी त्यावेळी विचारले की ओम कशाला लिहिले. मला आता राहुल गांधी यांना प्रश्न विचारायचा आहे की ओम नाही तर मग विमानावर काय लिहायचे होते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात राफेलच्या पूजेवरून राजनाथ सिंह यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली. कॉंग्रेससह इतर विरोधकांनी राफेल विमानाची पूजा करण्याची खिल्ली उडविली होती. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी आता राहुल गांधींपुढे प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली होती. राफेल विमान खरेदी करण्याच्या कोट्यवधी रुपयांच्या करारावरून भाजप नेत्यांच्या मनात अपराध भावना आहे. राफेलचा मुद्दा अजूनही भाजप नेत्यांना झोंबतो आहे. त्यामुळेच राजनाथ सिंह पहिले राफेल विमान घेण्यासाठी फ्रान्सला गेलो होते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.

लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी राफेल करारामध्ये गैरव्यवहार असल्याचे सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. आपल्या प्रचारामध्ये कॉंग्रेसने राफेल कराराचा विषय मोठ्या प्रमाणात वापरला होता. तरीही कॉंग्रेसला या निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. गेल्या आठवड्यात दसऱ्याच्या दिवशी पहिले राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले. या कार्यक्रमासाठी राजनाथ सिंह फ्रान्सला गेलो होते. त्यावेळी त्यांनी राफेलची पूज केली होती. त्यावरूनच विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.