कराडमध्ये गॅसच्या स्फोटात तीस लाखांचे नुकसान

कराड -गुरूवार पेठेत असणाऱ्या दर्गाह मोहल्ला परिसरात पहाटे चारच्या सुमारास गॅसच्या स्फोट झाला. पीर मुर्तजा हजरत अली दर्गाह ट्रस्टच्या इमारतीत फरसाणच्या दुकानात स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज झाला.
या स्फोटात ट्रस्टसह फरसाण दुकानाच्या साहित्याचे तीस लाखांचे नुकसान झाले आहे. तर हजरत अली ट्रस्टच्या पीर बसवले जातात त्याच्या साहित्याचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे.

जैन फरसाण दुकानात काल रात्री उशिरा काम संपवून लोक गेले. मात्र पहाटे चारच्या सुमारास आत असलेल्या गॅसचा जबरदस्त स्फोट झाला. जोराचा आवाज झाला. त्यावेळी लागलेली आग दोन तासाने आटोक्यात आली. या आगीत सुमारे तीस लाखांचे नुकसान झाले आहे. दिवाळीच्या आधी हा स्फोट झाल्याने मागील वर्षी चावडी चौकाजवळ झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.