खेड शिवापूर -वेळू (ता. हवेली) येथील शारदा-गणपतीच्या गळ्यातील चांदीचा हार लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.
वेळू येथे “एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत जय हनुमान मित्र मंडळ दरवर्षी शारदा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करीत असते. गावातील युवकांनी गणेश मूर्तीसाठी तीन किलो वजनाचे दोन हार बनवले होते.
मंगळवारी (दि. 1) सकाळी गणेश मूर्तीची आरती झाल्यानंतर गणेश मूर्तीच्या गळ्यातील दीड किलोचे दोन चांदीचे हार चोरीला गेले असल्याचे मंडळातील कार्यकर्त्यांच्या निदर्शनात आले.