नवी दिल्ली – देशात करोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी विविध शहरांत करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झालेली झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोज हजारो लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे.
Did the cops at Bariley’s Baradari police station really hammer nails into this person’s body for not wearing a mask.?@Uppolice — do you have an explaination? pic.twitter.com/yJfHYD9mTn
— Radhika Parashar (@_RadhikaReports) May 26, 2021
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून प्रत्येक शहरात कडक निर्बंध सुद्धा लागू करण्यात आले आहे. मात्र असे असतांनाही अनेक ठिकाणी कडक निर्बंध सामान्य कडून पालन होतांना दिसत नाही. अनेकांकडून नियमांचे तीन तेरा वाजले जाते, तर काही ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्यावर खोटे आरोप केल्याचे प्रकारही समोर येत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली आहे.
कडक निर्बंधाचे उल्लंघन करत मास्क न घातल्याने एका तरुणाच्या हातापायात खिळे ठोकल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे. पीडीत तरुण त्याच्या आईसह वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेले असाताना हा प्रकार उघडकीस आला आहे. या पीडीत तरुणाचं नाव रणजित आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. अटकेपासून बचाव व्हावा यासाठी रणजितने हे सगळं नाटक रचल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
थाना बारादरी क्षेत्रान्तर्गत एक युवक द्वारा पुलिसकर्मियों पर लगाये गये दुर्व्यवहार सम्बंधी आरोपों की जांच से पुष्टि नही होने के सम्बन्ध में वरिष्ठ पुलिस अधीक्षक जनपद बरेली की बाईट । #UPPolice @Uppolice @adgzonebareilly @igrangebareilly https://t.co/vs4Uz4xCId pic.twitter.com/mYi0m4qI7S
— Bareilly Police (@bareillypolice) May 26, 2021
याबाबत, बरेलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोहित सिंह साजवान यांनी सर्व आरोपाचं खंडन केलं आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी तरुणानेच हे कांड केल्याचं सांगितलं. एसएसपी साजवान म्हणाले की, रंजीत 24 मे रोजी मास्क न घालता फिरत होता. पोलिसांनी याबाबत त्याला विचारणा केली. मात्र त्यानं वाद घातला. त्याच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यापासून वाचण्यासाठी रजींतनं स्वत: हातात आणि पायात खिले ठोकून घेतले आहेत.