…अन् जाता-जाता तरुणीने चौघांना दिले जीवदान

पुण्यात करोनाकाळात अकरावे अवयवदान

पुणे- मेंदुमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईने मुलीच्या अवयवदानास परवानगी दिल्यावर ह्रदय, यकृत, किडनी आणि स्वादुपिंड हे अवयव शहरातील विविध रुग्णालयांतील प्रतीक्षेवरील रुग्णांसाठी दान करण्यात आले. करोनाच्या काळात हे या वर्षीचे हे अकरावे अवयवदान ठरले आहे. त्यामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे.

 

वाकड येथील तरुणी पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करत होती. मात्र, तिच्या मेंदुत रक्तस्राव झाल्याने तिला उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, तिच्या वडिलांचेही दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे आईवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशा परिस्थितीतही आपली मुलगी अवयवरुपी जिवंत राहावी, यासाठी अवयवदान करण्यास तिने परवानगी दिली.

 

त्यानंतर डॉक्टरांनी हृदय, यकृत, स्वादुपिंड आणि एक किडनी पुण्यातील विविध खासगी रुग्णालयांतील अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना देण्यात आले. तर, दुसरी किडनी नाशिक येथील खासगी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.