आवाजी मतदानाच्या आधारे विश्वासदर्शक ठराव मंजूर
बंगळुरू : कर्नाटकातील सत्तासंघर्षाला अखेर आज पुर्णविराम मिळाला आहे. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या येडियुरप्पा सरकारने बहुमत चाचणीत यश मिळवले आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीत येडियुरप्पा सरकारने आवाजी मतदानाने आपले बहुमत सिद्ध केले आहे.
Karnataka Chief Minister BS Yediyurappa wins trust vote through voice vote. pic.twitter.com/DvzzMmYCqa
— ANI (@ANI) July 29, 2019
दरम्यान, विरोधी पक्षाने याचा विरोध करत मतदानाची मागणी केली होती. परंतु, ती मागणी फेटाळून लावत विधानसभा अध्यक्षांनी बहुमत ठराव पास केला. मागील काही दिवसांपासून कर्नाटकात सुरु असलेल्या राजकिय नाट्याचा आज शेवट झाला आहे. आज सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभागृहात बहुमत सिद्ध ठराव ठेवण्यात आला. यावेळी आवाजी मतदानाच्या आधारे हा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी आपला प्रत्येक क्षण हा राज्याच्या जनतेसाठी असल्याची ग्वाही दिली.