Wreckage of a Pak submarine : भारतीय नौदलात नुकतेच डीप सबमर्जन रेस्क्यू वेहिकल म्हणजेच डीएसआरव्ही सामील झालेले आहे. या डीएसआरव्ही व्हेईकलच्या मदतीने नौदलाने पाकिस्तानच्या जलसमाधी मिळालेल्या पीएनएस गाझी या पाणबुडीच्या अवशेषांचा शोध लावलेला आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ही पाणबुडी भारतीय नौदलाने बुडवली होती.
समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अडीच किलोमीटर आतमध्ये आणि शंभर मीटर खोलीवर टेंथ क्लास वर्गातील या पाणबुडीचे ऐतिहासिक अवशेष सापडलेले आहेत. 1971 मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात भारतीय नौदलाने पीएनएस गाझी ही पाणबुडी नष्ट केली होती. याच युद्धातून 1972 मध्ये पुढे बांगलादेशची निर्मिती झाली. | Wreckage of a Pak submarine
पीएनएस गाझी ही मूळची अमेरिकेच्या नौदलातील पाणबुडी होती. यूएसएस डायब्लो असे तिचे नाव होते. त्यावेळी पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान एकत्रित असल्याने ही पाणबुडी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आलेली होती आणि भारताची विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतवर हल्ला करण्याचा तिचा डाव होता. | Wreckage of a Pak submarine
त्यावेळी विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर असलेल्या या पाणबुडीवर भारताच्या आय एन एस राजपूत या युद्धनौकेने हल्ला चढवून ती बुडवली. भारताने ही घटना लष्करी हल्ल्यातून घडल्याचे स्पष्ट केले. मात्र पाकिस्तानने पीएनएस गाझी ही पाणबुडी अपघाती स्फोटामुळे बुडाल्याचे जाहीर केले होते. आता पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष सापडल्यामुळे 1971 च्या युद्धावर आणखी प्रकाश पडण्याची शक्यता आहे. | Wreckage of a Pak submarine
बंगालच्या उपसागरात जलसमाधी मिळालेली पीएनएस गाझी ही एकच पाणबुडी नाही. आणखी एक पाणबुडी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान याच परिसरात बुडाली. ती जपानच्या नौदलाची आरओ वन वन झिरो ही पाणबुडी होती. या पाणबुडीचे अवशेषही डीएसआरबीला सापडले आहेत. मात्र जपानी पाणबुडीला कुठलाही धक्का न लावण्याचा निर्णय नौदलाने घेतला आहे. कारण त्या ठिकाणी शूर जपानी सैनिक चिरनिद्रा घेत आहेत असा विश्वास जपानला आहे.
भारतीय नौदलाकडील डीएसआरव्ही ही यंत्रणा अत्याधुनिक पाणबुड्यांची सुटका करण्याची क्षमता बाळगून आहे. ही यंत्रणा समुद्राखाली 1000 मीटर पर्यंत काम करू शकते पाणबुडी वर काही दुर्घटना झाल्यास मदत व सुटका कार्य करण्यास ही व्हेईकल्स प्रभावी कामगिरी बजावू शकतात. पीएनएस गाझी या पाणबुडी अवशेषांच्या शोधातून भारताचे नौदल क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. जगातील काहीच देशांकडे डीएसआर वेहिकल्स आहेत. | Wreckage of a Pak submarine