नवी दिल्ली : विशाखापट्टणम येथील किनाऱ्यावरून के -4 या बॅलेस्टिक मिसाईल्सची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
या मिसाईल्सची 3हजार 500 किमी मारा करण्याची क्षमता आहे. गेल्या सहा दिवसांत त्याची दुसरी चाचाणी यशस्वीपणे घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची पाण्याखालून चाचाणी घेण्यात आल्याचे सरकारच्या सूत्रांनी सांगितले.
डीआरडीओने विकसित केलेले या क्षेपणास्त्राने संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी अरीहंत सज्ज करण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र विकसित झाल्यानंतर भारतीय नौदलला आण्वीक अस्त्रांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र महत्वाचे मानले जाते.