मंत्री भरणे यांचे गौरवाद्गार ः शेळ्या, मेंढ्यांच्या बाजारात कॉंक्रिटीकरण
चिंबळी -चाकणच्या बाजारामध्ये देशातील व्यापारी शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी येत असतात. येथील शेळ्यामेंढ्याच्या बाजारात सुद्धा खरेदी विक्रीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. त्यामुळे या बाजाराची उलाढाल मोठी असून, प्रशासकीय कामकाजही उत्तम प्रकारे सुरू आहे. राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जाईल, अशी ग्वाही पशूसंवर्धन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण उपबाजारच्या शेंळ्या मेंढ्या बाजार येथे दोन कोटी रूपये खर्च करण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे उद्घाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती बाळशेठ ठाकूर, उपसभापती सुगंधा शिंदे, माजी सभापती विलास कतोरे, चंद्रकांत इंगवले, शांताराम भोसले, धैर्यशील पानसरे, सुरेखा टोपे, बाबाजी काळे, पांडूरंग बनकर, अमर कांबळे, राजाराम लोखंडे, नवनाथ होले, कैलास सांडभोर, दशरथ गाडे, जयसिंग भोगाडे, संध्या जाधव, दत्तात्रय भेगडे, सुरेश शिंदे, कैलास लिंभोरे, माणिकराजे निंबाळकर, जे. बी. मुलाणी, शंकर टल्लू जैद, देवराम सोनवणे, शरद मुऱ्हे, भगवान लोखंडे, गुलाब शेवकरी, राहुल नाईकवाडी, मोबिन काझी, नगरसेवक प्रकाश भुजबळ, सुदाम शेवकरी, शांताराम सोनवणे, सयाजी मोहिते, वैशाली बारणे, बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे आदींसह बाजार समितीचे सर्व संचालक, सदस्य, कर्मचारी, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती बाळशेठ ठाकूर यांनी केले. विनायक घुमटकर यांनी आभार मानले.
गेल्या पंधरा वर्षांत बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर विविध विकासकामे करण्यात आली आहे. पावसाळ्यात शेळ्यामेंढ्याच्या बाजारात चिखल होत असल्याने जनावरांची व व्यापाऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत होती. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करून तीन एकर क्षेत्रात सिमेंट कॉंक्रिटीकरण केले आहे. रोहकल रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे काम थोड्याच दिवसांत पूर्ण केले जाईल.
-दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड