पाथर्डी – राजकीय जीवनात आलेल्या संधीचे सोने करत स्व. बबनराव ढाकणे यांनी स्वकर्तुत्वाने आपल्या तालुक्याचे नाव देशपातळीवर कोरले. त्यांचे कार्य कायम स्मरणात ठेवत नव्या पिढीने वाटचाल करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले.
शहर प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या ढाकणे यांच्या सर्वपक्षीय शोकसभेच्या वेळी राजळे बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या सुशीला मोराळे होत्या. या वेळी व्यासपीठावर सुभाष घोडके, दिनकर पालवे, भगवान बांगर, संभाजी दहातोंडे, सुरेश आव्हाड, अभय आव्हाड, माणिक खेडकर, संजय बडे, किशोर राजगुरू, रफिक शेख, रावसाहेब मोरे, मुरलीधर दहिफळे, डॉ. मृत्यूंजय गर्जे, दत्तू पठाडे, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, सविता भापकर, कैलास दौंड, बंडू पाटील बोरुडे, माधव काटे, गहिनीनाथ थोरे, प्रकाश दहिफळे, भारत गाडेकर, विष्णुपंत अकोलकर, नासिर शेख हे उपस्थित होते.
मोराळे म्हणाल्या की, ऊसतोड मजूर हा त्यांच्या राजकारणाचा गाभा होता. मजुरांच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. सध्या तुमच्या तालुक्यात जे दिसते ते सर्व ढाकणे यांची निर्मिती असून त्याच त्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्यापेक्षा यावेळी बप्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवत ढाकणे यांना श्रद्धांजली व्हा, असे आवाहन केले.