पुणे – शहरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. शहरातील कमाल व किमान तापमानात घट होणार असल्याचे वेधशाळेने सांगितले.
आग्नेयकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे गोवा, सिंधूदुर्ग भागात तुरळक ठिकाणी तर रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे शहर व जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, 15 नोव्हेंबरनंतर किमान तापमानात वाढ होईल, असेही हवामान विभागाने सांगितले.