वाशिंग्टन – समुद्रातील महत्त्वाचा जलचर असलेल्या व्हेल माशाची उत्क्रांती कशी झाली याबाबतच्या कुतूहलाला अखेर पूर्णविराम मिळाला असून सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर अस्तित्वात असलेल्या हरणा पासूनच व्हेल माशाची उत्क्रांती झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. अमेरिकेतील नॉर्थ ईस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधनामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या संस्थेच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्याकाळात जमिनीवर बागडणाऱ्या आणि वावरणाऱ्या हरण पासूनच नंतर व्हेल मासा उत्क्रांत झाला ही हरणे खाण्याचा शोध घेत आणि स्वतःची शिकार होऊ नये म्हणून पाण्याजवळ जात होती. एखाद्या पाणघोड्याप्रमाणे त्यांना पोहायलाहि येऊ लागले होते.
काही काळा नंतर ह्या हरणांचे व्हेल माशा मध्ये रूपांतर झाले हरणांच्या मागच्या पायांचे रूपांतर व्हेल माशाच्या कल्यामध्ये झाले व्हेल मासा हा सस्तन प्राणी असून तो समुद्रात कसाकाय आढळतो याबाबत शास्त्रज्ञांना दीर्घकाळ कुतूहल होते आता या कुतूहलाला पूर्णविराम मिळाला आहे.
याबाबतचे काही अवशेष पाकिस्तानमध्ये सापडले आहेत पाकिस्तान मध्ये साधारण कोल्ह्याच्या आकाराचे हाडाचे सापळे सापडले आहेत. या सापळ्यांचा संशोधन केल्यानंतर ही गोष्ट लक्षात आले या प्राण्यांचा मेंदू आणि कानाचे हिस्से व्हेल माशाप्रमाणे आहेत.
भूचर प्राण्यांचे जेव्हा काही काळाने जलचर प्राणात रुपांतर होते. तेव्हा अशा प्राण्यांना इंडोहायस असे म्हटले जाते आणि पाच कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेली काही हरणे ही इंडोहायस पद्धतीची होती त्यांच्यामुळेच समुद्राला व्हेल मासा मिळाला.