गंजबाजारातील तीनमजली वाड्याची भिंत कोसळली

नगर  -शहरातील गंजबाजारमधील एका तीन मजली वाड्याची भिंत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. बाजूला असलेले बांधकाम सुरु असल्याने ही भिंत कोसळी. यावेळी सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

नगर शहरातील मध्यवस्तीत असलेली गंजबाजार येथे एका जुन्या वाड्याची भिंत मध्यरात्री अचानक कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, बाळासाहेब घाटविसावे, अशोक काळे,  आरिफ शेख, शिवाजी कदम, पांडुरंग घाडगे यांसह महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने इमारतीचा धोकादायक भाग उतरविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.