प्रतीक्षा संपली! बहुचर्चित ‘पळशीची पीटी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

कांन्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्या चित्रपटाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे नाव गौरवित केले अशा बहुचर्चित “पळशीची पीटी…गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची” सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे.

साताऱ्यातील पळशी गावातून जन्मलेल्या या कथेमध्ये भागी आणि विकास या दोन मुख्य पात्रांची कहाणी सांगण्यात आली आहे. भागीची तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा संघर्ष , यामध्ये तिला कोण मदत करतं किंवा कोण मागं खेचतं हे अगदी सहजपणे दाखवण्यात आलेलं आहे. दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांचा हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे त्यांची या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.

पळशीची पीटी या सिनेमाला महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान देऊन गौरविण्यात आले तसेच संस्कृती कलादर्पण, गोवा मराठी चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तसेच आंतरराष्ट्रीय कांन्स चित्रपट महोत्सवातदेखील आपली चित्रपटरूपी कला सादर करण्याची संधी मिळाली.

दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट “पळशीची पीटी” मध्ये ‘भागी’ ची भूमिका साकारणारी किरण ढाणे, राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे, विद्या सावळे, शिवानी घाटगे , दिक्षा सोनवणे,निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे तसेच तेजपाल वाघ यांनीदेखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून लागीर…मध्ये ‘जितू काका’ यांची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच संपादन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.