शरद पवार पुरग्रस्त भागात स्वांतत्र्य दिन साजरा करणार

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार स्वातंत्र्य दिन पूरग्रस्त भागात साजरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा, सांगली, कोल्हापुरात महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 14, 15 ऑगस्टच्या दौऱ्यासाठी शरद पवार कराडला जाणार आहेत.

पुरग्रस्त भागात शरद पवार आज आणि उद्या दौरा करणार आहेत. तसेच याच भागात ते यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. अज कराडहून हातकणंगले व शिरोळचा दौरा करतील. 15 ऑगस्टला शिरोळमध्ये ध्वजवंदनानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होतील. चिखली, आंबेवाडी, वडंगे, कसबा बावडा या गावांना भेटी देतील. नंतर कोल्हापुरात पत्रकार परिषदेला संबोधित करून पुण्याकडे निघणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.