अखेर प्रतीक्षा संपली… ‘या’ तारखेला होणार नागराज मंजुळे व बिग बींचा बहुप्रतीक्षित ‘झुंड’ सिनेमा रिलीज

स्वतः हा बिग बींनी सांगितली प्रदर्शनाची तारीख

मुंबई – दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. मागील वर्षी या चित्रपटाचा ऑफिशल टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट बनून तयार झाला आहे. पण कोरोना संकटामुळे हा चित्रपट अडकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

दरम्यान, आता पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाऊन उठला असून ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर येऊन पोचला आहे. काल (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत झुंड चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर चित्रपटाची तारीख शेअर केली आहे. झुंड हा चित्रपट 18 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सैराट, फँड्रीसारखे तगडे चित्रपट यापूर्वी नागराज मंजुळे यांनी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे आता नागराजच्या आगामी ‘झुंड’ सिनेमालाही सैराटप्रमाणेच रसिकांची पसंती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.