पुणे – शिरूर तालुक्यातील सणसवाडीजवळील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.
सणसवाडीजवळील एल अँड टी फाटा येथील ब्राईट कंपनीला आज भीषण आग लागली. आगीने संपूर्ण कंपनीला वेढा घेतला असून घटनास्थळी धुराचे लोट आणि आगीचे लोळ दिसत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे.
दरम्यान, सदर कंपनीच्या चारही बाजूने अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.