पुणे – केवळ टोळीप्रमुखाच्या गावचा आहे. त्यामुळे आरोपीचा गुन्ह्याशी संबंधीत आहे, असे म्हणता येणार नाही. टोळीप्रमुख अथवा टोळीशी संबंध नसल्याच्या कारणावरून दरोडा प्रकरणत मोक्का लावलेल्या आरोपीला विशेष मोक्का न्यायाधीश ए.एन. सिरसीकर यांनी जामीन मंजुर केला आहे. त्याचे नाव एफआयआरमध्ये नाही. तो पुण्यात आल्याचा अथवा लॉजमध्ये राहिल्याची नोंद नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली.
भारत बद्रीनाथ चनघटे (रा. पिंपरखेड पो. वाळुंज, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ऍड. खय्युम नय्युम सय्यद आणि ऍड. आकाश चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होत. येथील पंचवटी पाषाण भागातील वृंदावन सोसायटीमध्ये मार्च 2021 रोजी काही लोकानी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्यात चनघटे याने इतर आरोपीस दरोडा टाकन्यास मदत केली व लंपास केलेले सोने विक्रीसाठी घेऊन गेल्याच्या आरोपावरून चतु:श्रृंगी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता.