बर्मिंगहॅम – दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना न्यूझीलंडविरूद्ध आज येथे होणाऱ्या लढतीत विजय अनिवार्य आहे. आतापर्यंत एकही सामना न गमविणाऱ्या न्यूझीलंडलादेखील बाद फेरीतील स्थान बळकट होण्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे.
बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर हा सामना सुरू होणार आहे. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस झाल्याने मैदान ओले झाल्याने टाॅस आणि सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे. इंग्लंड देशाच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळपट्टीची पाहणी दोन्ही पंच करणार आहेत, आणि त्यानंतर सामन्याबदल माहिती देणार आहेत.
https://twitter.com/cricketworldcup/status/1143806115488157696
Ads