शिक्रापूर, (वार्ताहर) – सणसवाडी येथील एडीको फोर्जिंग कंपनीमध्ये सुरक्षारक्षक पहारा देत असताना तिझघांनी दगडफेक करीत चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रवीण बाप्पूराव सांगळे (वय 22, सध्या रा. सणसवाडी; मूळ रा. पाटसारा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अनोळखी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे तिघेजण कंपनीच्या भिंतीवरुन आत आल्याचे दिसल्याने सुरक्षारक्षक त्यांच्या दिशेने जाताच आरोपींनी सुरक्षारक्षकांच्या अंगावर दगडफेक करत पळ काढला, दरम्यान सुरक्षारक्षकांनी याबाबतची माहिती कंपनी व्यवस्थापकांना दिली,
त्यांनतर दुसर्या दिवशी पुन्हा असाच प्रकार निदर्शनास आल्याने सर्व सुरक्षारक्षक आरोपींना पकडण्यासाठी गेलेले असता त्यांनी पुन्हा सुरक्षारक्षकांच्या अंगावर दगडफेक करुन त्यांच्या जवळील कोयता तेथेच सोडून पळून गेले.
त्यावेळी सुरक्षारक्षक व कंपनी प्रशासनाने कंपनीत पाहणी केली असता कंपनीतील दीड लाख रुपये किमतीचे लोखंडी पार्ट सदर इसमांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.