पुणे – काल रात्रीच्या सुमारास अप्पर इंदिरानगर भागात एका घरातील घरगुती सिलेंडरचा भयंकर स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता कि घरासमोरील भिंती फोडून घरातली सर्व सामान आणि जाळ समोरील कॅन्टीन पर्यंत गेला. दरम्यान, या घटनेमुळे अप्पर भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.