Sangharsh Yoddha Movie teaser : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जरांगे यांच्यावर आधारित संघर्षयोद्धा नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
संघर्षाची धगधगती मशाल हाती घेऊन मराठ्यांच्या नेतृत्वासाठी झंझावात बनून तेवत राहणाऱ्या नेतृत्वाच्या संघर्षाची गाथा.. अशा कॅप्शनखाली चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. २६ एप्रिल २०२४ ला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. | Sangharsh Yoddha Movie teaser
‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी करण्यात आले आहे. तसेच चित्रपटातील बराचसा भाग खऱ्याखुऱ्या आंदोलनादरम्यान शूट करण्यात आल्याचे टीजरवरून समजते. | Sangharsh Yoddha Movie teaser
“मी बायोकोला सांगितलय.. आलो तर तुझा.. गेलो तर समाजाचा.. कुंकू पुसून तयार रहा..” असे जबरदस्त डायलॉग चित्रपटात असणार आहे.हे टीजरवरून समजते. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे.
View this post on Instagram
यासह अभिनेते संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके अशा दमदार अभिनेत्यांची फौज या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. | Sangharsh Yoddha Movie teaser