Stock Market Today : भारतीय शेअर बाजाराने सोमवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात वाढ नोंदवली आहे. आज सोमवार (दि. 4 मार्च) बीएसई सेन्सेक्स 73,872 अंकांच्या सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाला.
बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स आज 100 अंकांच्या वाढीसह 73,903.09 अंकांवर उघडला. व्यवहारादरम्यान 74 हजारांच्या अगदी जवळ आला आणि 73,990.13 अंकांच्या पातळीवर पोहोचला होता.
शेवटी, सेन्सेक्स 0.09 टक्के किंवा 66.14 अंकांच्या वाढीसह 73,872.29 या सर्वकालीन उच्च पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील 15 कंपन्यांचे समभाग हिरव्या तर 15 कंपन्यांचे समभाग लाल रंगात बंद झाले.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी-50 देखील 0.12 अंकांच्या किंवा 27.20 टक्क्यांच्या वाढीसह 22,405.60 अंकांवर बंद झाला. 25 निफ्टी कंपन्यांचे शेअर्स हिरव्या तर 25 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.
सर्वाधिक वाढलेले शेअर्स (Top Gainers)
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 3.50 टक्क्यांनी वाढून बंद झाले. तसेच पॉवर ग्रीड 2.63 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.03 टक्के, ॲक्सिस बँक 0.90 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.77 टक्के वाढीसह बंद झाले.
सर्वाधिक घसरलेले शेअर्स – (Top Losers)
दुसरीकडे, JSW स्टीलचे समभाग सर्वाधिक 2.49 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा 1.75 टक्के, टाटा स्टील 1.32 टक्के, अल्ट्रा सिमेंट 1.32 टक्के, इन्फोसिस 1.05 टक्के घसरणीसह बंद झाले.
खालील चित्रात तुम्ही इतर सेन्सेक्स समभागांची स्थिती पाहू शकता-