यशाचे शिखर… गौरीशंकर

अत्यंत प्रतिकूलतेमधून उभे राहिलेले यशाचे शिखर गौरीशंकर प्रा. मदनराव जगताप यांच्या अथक परिश्रमातून साकारले आहे. वेळ, काळ याची तमा न बाळकता अहोरात्र ज्ञानसंकुलाची यशस्वीपणे उभारणी हाच एक ध्यास घेवून गौरीशंकरची निर्मिती केली. गौरीशंकरच्या उभारणीतून अनेकांचे अनमोल सहकार्य लाभले. यामुळेच विविध ज्ञानाचे कवाडे विद्यार्थ्यांनी खुली झाली. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्वल करिअरसाठी एक व्यासपीठ गौरीशंकर माध्यमातून उभे झाले. के. जी. ते पी. जी. पर्यंतचे ज्ञानाच्या सर्वच शाखा एकाच कॅम्पसमध्ये निर्माण झाल्या. प्रा. मदनराव जगताप यानी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून केलेल्या वाटचालीमुळेच अल्पावधीत गौरीशंकर संस्था नावारुपास आली. याविशयी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर याचा विशेष लेख…..

 

गौरीशंकरच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीत आजवर अनेक अडचणी, संकटे उभी राहिली. खोट्या अफवा पसरुन अनेकानी भाटगिरी केली. परंतु जे सत्य असते ते अटल असते तेच टिकते हे गौरीशंकरने पुन्हा एकदा सिध्द केले. गौरीशंकरने शैक्षणिक क्षेत्रात केलेली उलेखनिय कामगिरीची दखल अनेक दिग्गजानी घेवून संस्थेचा उचित गौरव केला आहे. अर्थात यासाठी संस्थेचे चेअरमनसो प्रा. मदनराव जगताप यानी घेतलेली मेहनत व परिश्रम कामी आले आहेत. ज्ञानक्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान द्भतीतून गौरीशंकरने साकारले आहे. या सर्व श्रेयाचे खरे शिल्पकार प्रा. मदनराव जगताप ठरले आहेत.

ज्ञानरुपी “”गौरीशंकर” –
औषध निर्माण क्षेत्रात नंबर एकचा बहुमान प्राप्त करणारे गौरीशंकर नॉलेज सिटीने साताराच्या ज्ञानक्षेत्रात नवी दिशा दिली आहे. सामान्यातील सामान्य घटकापर्यंत ज्ञानाचे कवाडे खुली झाली आहेत. हिच भूमिका गौरीशंकर संस्थेने ठेवली. ज्ञानक्षेत्रात सातत्याने नविण्यपूर्ण अभ्यासक्रमाची ध्यास घेवून ते विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे अखंडपणे कार्य सुरु आहे. ग्रामीण व शहरी भागातील असंख्य विद्यार्थ्यांना या ज्ञानपीठाची साथ लाभत आहे. उज्वल करिअरचा एक राजमार्ग गौरीशंकर संस्थेने विद्यार्थ्यांना दाखविला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विविध अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना घडविले जात आहे नव्हे तर ते राष्ट्रप्रगतीला पूरक मनुष्यबळ निर्मिती केली जात आहे. सातत्याने विद्यार्थी घटकाची प्रगतीचे ध्येय ठेवून वाटचाल करणाऱ्या या संस्थेने असंख्य विद्यार्थ्याचे जीवन घडविले आहे. देशात आणि परदेशात गौरीशंकर संस्थेचे विद्यार्थी मोठमोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे. ज्ञानक्षेत्रातील हे ज्ञानपीठामुळे सामान्य घटकातील विद्यार्थी ही इंजिनिअर व फार्मासिस्ट घडला आहे. या क्षेत्रातील घेतलेल्या ज्ञानाच्या आधारे ते स्वत:बरोबरच समाज व देशाची प्रगती करीत आहेत.

गौरीशंकरचे ज्ञानपीठ हे विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याबरोबरच संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी ही योगदान देत आहे. शिस्त, संयम हे प्रगतीचे चाके आहे. ती गतीमान झाल्याशिवाय प्रगतीचे व विकासाचे स्वप्न साकारता येत नाही याची जाणीव ठेवूनच वेगवेगळया सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमातून त्यांच्यावर संस्कार घडविले जात आहेत. आजच्या नव्या पिढीसमोरील असणारे आव्हाने व संधी कोणत्या याचीही जाणीव संस्था स्तरावरुन विद्यार्थ्यांना दिली जात आहे. काळानुसार बदल घडविणारेच खऱ्या अर्थाने स्पर्धात्मक स्पर्धा यशस्वी होतात याचे भान ठेवून संस्थेने विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण प्रणालीबरोबरच उद्योग जगताशी समन्वय ठेवून शैक्षणिक करार केले आहेत. मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आता गौरीशंकर संस्था सज्ज आहे. मार्ग यशाचा दाखविणारी ही संस्था नाविण्याचा ध्यास घेवून विद्यार्थी ज्ञानसंपन्नतेने घडवित आहेत.

उज्वल करिअरचा राजमार्ग “”गौरीशंकर”-

ध्येय निश्‍चिती व सकारात्मक विचाराचे बाळकडू विद्यार्थ्यांना देवून असंख्य विद्यार्थ्यांचे जीवनमान फुलविणारे गौरीशंकर नॉलेज सिटीने आजवर इंजिनिअर, फार्मासिस्ट, अधिकारी, व्यवस्थापक बरोबरच असंख्य विद्यार्थी घडविले. उज्वल करिअरचा राजमार्ग गौरीशंकर …… गौरीशंकरने समाजात अढळ स्थान निर्माण केले आहे. करिअरच्या वेगवेगळया वाटा या संस्थेत उपलब्ध आहेत याचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. संस्थेचे चेअरमनसो प्रा. मदनराव जगताप यांच्या अथक परिश्रमातून ही संस्था साकारलेली आहे. विद्यार्थ्यांचे हित हेच संस्थेने ध्येय ठेवले आहे. दर्जात्मक शिक्षणाची कास धरुन वाटचाल करणाऱ्या या संस्थेचे विद्यार्थी नेहमीच गुणवत्तेमध्ये चमकदार कामगिरी करुन संस्थेचा नावलौकिक उंचाविला आहे.

ज्ञानक्षेत्रात गौरीशंकर नंबर वन हे येथील प्राध्यापकानी गुणवत्तेवर सिध्द केले. अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी शिवाजी विद्यापीठाच्या व एम. एस. बी. टी. ई. च्या गुणवत्ता यादीत चमकले. सध्या मंदीचे दिवस आहेत हे खरे आहे पण या परिस्थितीत ही गौरीशंकर सक्षमपणे उभे आहे. विद्यार्थी, पालक व हितचिंतकांचे पाठबळ ही गौरीशंकरची ऊर्जा आहे. गौरीशंकर ही सामान्यातील सामान्य विद्यार्थ्यांना आधारवड ठरणारी एक ज्ञानरुपी मंदिर आहे. सक्षम समाज निर्मितीसाठी झटणाऱ्या प्रा. मदनराव जगताप यांनी हे व्रत म्हणून घेतले आहे. त्यांनी या क्षेत्रात अखंडपणे कार्य करणाऱ्या निर्धार अनेकासाठी प्रेरणादायी आहे.

-श्रीरंग काटेकर
जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नॉलेज सिटी

Leave A Reply

Your email address will not be published.