रिफेक्‍टरी प्रकरणातील विद्यार्थ्यांना जामीन

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्‍टरी (भोजनालय) येथे सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद करण्यात आली होती. या विरोधात विद्यार्थ्यांनी रिफेक्‍टरीसमोर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी 12 जणांवर गुन्हे दाखल केले होते. या सर्वांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

रिफेक्‍टरीचे नवीन नियम हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणार आहेत. त्यामुळे हे सर्व नवे नियम रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी दंगा घातला आणि सुरक्षा रक्षकांना धक्‍काबुक्‍की केल्याचा आरोप करत प्रशासनाने पोलीस तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, विद्यार्थ्यांतर्फे सत्र व जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणण्याचे कलम विद्यार्थ्यांवर लागू होत नाही. तसेच विद्यापीठ कर्मचारी लोकसेवक ठरत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, अशी माहिती ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांना हंगामी अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला. विद्यार्थ्यांतर्फे ऍड. ठोंबरे, ऍड. हितेश सोनार, ऍड. नीलेश वाघमोरे यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.