शिक्रापूर -अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीसाठी छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील माती पाठवण्यात आली आहे, अशी माहिती माजी उपसरपंच संतोष शिवले यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात श्रीराम मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे चांदीच्या कलशामध्ये श्रीक्षेत्र वढू आणि हिंदू जागरण मंचच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्याकडे ही मृदा सुपूर्द करण्यात आली.
यावेळी राजेंद्र गावडे, निलेश भिसे, माजी उपसरपंच संतोष शिवले, महेश यशवंत, रामदास शिवले, अविनाश मरकळे व ग्रामस्थ उपस्थित होते.