पाबळ (प्रतिनिधी) राजेंद्र वारघडे – पाबळ येथील संजय शेबडे या सर्पमित्राने स्वतःच्याच शेतात आढळलेल्या दोन अजगरांना पकडून जंगलात सोडून दिले आहे.
पाबळ हुन दोन किलोमीटरवर असलेल्या शेळी फार्मजवळ हे अजगराचे जोडपे क्रीडा करत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, तेथील शेळ्यांना धोका होऊ नये यासाठी अत्यन्त चलाखीने पाण्याच्या हौदाकडे वळवून त्या जोडीला बाटलीत बंद करण्यात आले. सर्प मित्र संजय शेबडे यांनी अशी माहिती दिली.