मुंबई – आज सकाळ पासूनच महाराष्ट्रातील राजकीय वातारवनाला एक वेगळा रंग आल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर, राष्ट्रवादीचे नेते ‘अजित पवार’ यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर राष्ट्रवादीच्या गोटात मोठे राजकारण रंगले आहे. आता थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पार पडणाऱ्या या बैठकीत नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या बैठकीसाठी धनंजय मुंडे देखील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. कालपासून धनंजय मुंडे यांचा कॉलही नॉट रिचेबल लागत असल्याने धनंजय मुंडे देखील अजितदादांसोबत असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, मुंडे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Mumbai: Nationalist Congress Party (NCP) leader Dhananjay Munde arrives at YV Chavan Centre for NCP meeting. pic.twitter.com/7LIDLNJLf7
— ANI (@ANI) November 23, 2019