पत्नीच्या नावावर प्रवरा बॅंकेचे 26 लाख 23 हजार कर्ज
नगर: नगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ.सुजय विखे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे 8 कोटी 87 लाख 75 हजार 266 जंगम मालमत्ता असून 1 कोटी 28 लाख 62 हजार 730 रुपये ही स्थावर मालमत्ता असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
डॉ. विखे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करतांना आपल्या मालमत्तेसह गुन्हेगारी, शिक्षण आदीचे विवरणपत्र जोडले आहे. त्यात डॉ. विखे यांच्या स्वतःच्या नावावर 4 कोटी 91 लाख 76 हजार 996 रुपये तर पत्नीच्या नावे 3 कोटी 95 लाख 98 हजार 270 रुपये जंगम मालमत्ता दाखविली आहेत तर 1 कोटी 8 लाख 67 हजार 280 रुपये तर 14 लाख 70 हजार रुपये स्थावर मालमत्ता नमुद करण्यात आली आहे. 5 हजार 25 हजार 450 रुपयाचे फार्म हाऊस आहे. स्वसंपादित मालमत्ता 4 कोटी 62 लाख 5 हजार 895 रुपये स्वतः डॉ. विखे यांच्या नावावर तर पत्नीच्या नावे 59 लाख 31 हजार 48 रुपये मालमत्ता असल्याचे नमुद केले आहे. तसेच वारसाप्राप्त मालमत्तामध्ये डॉ. विखे यांच्या नावे 1 कोटी 63 लाख 73 हजार 568 तर पत्नीच्या नावे 52 लाख 23 हजार 768 रुपये मालमत्ता आहे. डॉ. विखेंच्या नावावर कर्ज नाही पण त्यांच्या पत्नीच्या नावे 26 लाख 23 हजार 964 रुपये प्रवरा बॅंकेचे मुदत ठेव पावतीतारण कर्ज आहे.
डॉ. विखे यांचे शिक्षण एम.बी.बी.एस जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेलगाम कर्नाटक येथे झाले असून एम.एस हे प्रवरा मेडिकल कॉलेज येथे ाले आहे. तर एम.सी.एच. न्युरो सर्जन हे शिक्षण डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथे झाले आहे. बॅंकेतील 3 कोटी 65 लाख 23 हजार 468 रुपये ठेवी व बचत स्वतःच्या नावे असून पत्नीच्या नावे ठेवी व बचत ही 1 कोटी 90 लाख 91 हजार 617 रुपये आहे. 5 लाख 71 हजार 300 रुपये स्वतः डॉ. विखे यांची गुंतवणुक आहे.
पत्नीच्या नावे टॅंकर, ट्रक
डॉ. विखे यांच्या पत्नीच्या नावावरच टॅकर, मिनी ट्रक व ट्रक आहे. टॅकरची किमत 23 लाख 14 हजार 52, मिनी ट्रकची किमत 12 लाख 84 हजार 394 तर ट्रकची किमत 30 लाख 90 हजार 320 अशी एकूण 66 लाख 88 हजार 766 रुपये वाहनांची किमत होत आहे.
1201 ग्रॅमचे दागिने
डॉ.विखे कुटुंबीयांकडे 37 लाख 25 हजार 561 रुपयांचे 1201 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आहेत. त्यात डॉ. विखे यांच्याकडे 15 लाख 84 हजार 472 रुपयांचे 511.12 ग्रॅम तर पत्नीकडे 21 लाख 41 हजार 89 रुपयांचे 690.674 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.