पिरंगुट -विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे घोटावडे फाटा चौकात पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला “जोडे मारो आंदोलन’ करत पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना निवेदन दिले. यावेळी सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, माजी जि. प. अध्यक्षा सविता दगडे, माजी जि. प. सदस्य सुभाष अमराळे, शांताराम इंगवले, राजाभाऊ हगवणे, बाळासाहेब सणस, दगडू करंजावणे, सुनील चांदेरे, बाबा कंधारे, सुनील वाडकर, कालिदास गोपालघरे, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, युवक अध्यक्ष नीलेश पाडाळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सतीश सुतार, कासार आंबोलीचे माजी सरपंच गणेश सुतार, राजेंद्र मारणे, जिल्हा युवक उपाध्यक्ष योगेश ठोंबरे, जितेंद्र इंगवले, रवींद्र गोळे, बाळासाहेब झोरे, सुखदेव चांदेरे, गणेश वाशिवले, विनोद सुर्वे उपस्थित होते.