मेलबर्न – श्रीलंका दौऱ्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघात करोनाची एन्ट्री झाल्यामुळे ही मालिका संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनाल्ड यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने दिली आहे.
मॅकडोनाल्ड यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता त्यांना विलगीकरणात उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दोरा होता. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेवर अर्थिक संकट निर्माण झाले तरीही ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दौऱ्यात 1 टी-20 आणि पाच एकदिवसीय सामने होणार आहेत.
यानंतर गॅले येथे कसोटी सामना होणार आहे. या मालिकेची सुरुवात कोलंबोतच 7 जूनपासून सुरू होत असलेल्या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.