पितृपक्षातील शिधेच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेस लूटले

पुणे – पितृपक्षात शिधा, जेवण आणी साडी देण्याचा बहाणा करत एका ज्येष्ठ महिलेची 9 हजाराची सोन साखळी चोरण्यात आली. ही घटना सदाशिव पेठेत घडली. याप्रकरणी विश्रामबाग वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पर्वती येथे रहाणाऱ्या 70 वर्षीय महिलेला एका महिलेने पितृपक्षातील शिक्षा, जेवण आणी साडी देण्याच्या आमिषाने सदाशिव पेठेत आणले होते. यानंतर अंधार खुन असल्याने तुमच्या गळ्यातील माळ माझ्याकडे द्या, कार्यक्रम झाल्यावर मी तुम्हाला परत देते असा बहाण करुन सोन्याची माळ हस्तगत केली. यानंतर फिर्यांदी महिलेचे नजर चुकवून संबंधीत महिला पळून गेली.

यासंदर्भात माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक व्हि.व्हि.जाधव यांनी सांगितले, फिर्यादी महिला खजिना विहीर येथे रस्त्यावर रुईच्या माळा विकते. एका महिलेने तीला वडिलांचे पित्र असल्याचे सांगत साडी व शिधा देण्याच्या बहाण्याने सोबत नेले. रस्त्यात जाताना परिसरात अंधार असल्याने गळ्यातील सोन माळ माझ्याकडे काढून द्या असे सांगत ते घेतले.

यानंतर त्यांना तुम्हाला जाताना आणखी एक सोनमाळ, साडी व पैसे देते असे सांगितले. चालत जाताना रस्त्याच्याकडेला एक चारचाकी थांबली होती, तीच्या आडून ही महिला पटकन पलिकडे निघुन गेली. फिर्यादीने तीला शोधायचा प्रयत्न केला असता ती दिसली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.