कोल्हापूर – कोल्हापुरातील मार्केट इथल्या रेल्वे गुडस यार्डात आज सकाळी सातच्या सुमारास मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा डब्बा घसरल्याची घटना घडली आहे. मालगाडी मध्ये असलेले सिमेंटची पोती रिकामी करण्यासाठी ही मालगाडी मार्केटयार्डच्या गोडावून परिसरात दाखल झाली होते.
दरम्यान प्लॅटफॉर्मवर गाडीमागे घेत असताना अचानक रेल्वेचा डबा रुळावरून घसरल्याने हा अपघात घडला आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
गेल्या तीन महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे. ही घटना घडताच रेल्वे अधिकारी व तांत्रिक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. प्राथमिक अंदाजात घुशी जमीन पोकरल्याने रुळा खालचा जमिनीचा भाग हा भुसभुशीत झाल्याने डबा घासरला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी रेल्वे स्थानकात रेल्वे डब्याला आग लागली होती त्यानंतर त्याच दिवशी मार्केटयार्डमधील रेल्वे गोडाऊन मध्ये मालगाडीतील सिमेंट पोती उतरताना एक बोगी उलटल्याने त्यात नऊ हमाल जखमी झाले होते.