Corona Vaccine | कोविड लसीची टंचाई; रशियाची लस आजच भारतात दाखल होणार

नवी दिल्ली – भारतात कोविड लसीची टंचाई असल्याने 1 मे पासून 18 वयोगटापुढील नागरिकांचे लसीकरण कसे होऊ शकणार याची शंका व्यक्त केली जात असतानाच रशियाची स्पुटनिक कोविड लस ही चिंता दूर करणार असल्याचे समजते. आज रात्रीपर्यंत रशियातून दोन विमाने ही लस घेऊन भारतात पोहोचत आहेत.

रॉयटरच्या बातमीनुसार मॉस्कोच्या गमालीया इन्स्टिट्यूट सह ही लस विकसित करणारे रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड प्रमुख किरोल दिमित्रेव यांनी स्पुटनिक पाचची पहिली बॅच 1 मे रोजी भारतात उपलब्ध होत असल्याचे सांगितले आहे.

यामुळे देशात 18 वर्षांच्या पुढच्या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेस मोठा हातभार लागणार आहे. भारताने 13 एप्रिल रोजी या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. मॉडर्ना, फायझरच्या लसी 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला जात असताना रशियाची ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचे रिपोर्ट येत आहेत.

या लसीमध्ये दोन वेगवेगळया व्हायरसचा वापर केला गेला असून 50 पेक्षा अधिक देशात या लसीला मंजुरी मिळाली आहे.भारतात ही लस 700 रुपयांपेक्षा कमी दरात मिळणार असल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.