पुणे, दि 29 – शहरातील चतुर्श्रुंगी पो स्टे, समर्थ पो स्टे, समर्थ पो स्टे ट्रॅफीक विभाग आणि बंडगार्डन पो स्टे यांना आयआरबी कंपनी तर्फे प्रत्येकी 5 वाफ घेण्याची यंत्रे, प्रत्येकी 150 मास्क आणि कॉन्सन्ट्रीक्स कंपनी, कॉम्पिटीटर्स फौ. तर्फे रेडी टू कुक फूड चे प्रत्येकी 50 फूड पॅकेट्स देण्यात आले. यावेळी आयआरबीचे सरव्यवस्थापक रवींद्र वायाळ, कॉन्सन्ट्रीक्स अविनाश तपासे, अतुल जगताप आणि उद्योजक संजय भंडारी उपस्थित होते.
समर्थ पो स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, चतुर्श्रुंगी पो स्टेशनचे राजकुमार वाकचवरे आणि बंडगार्डनचे यशवंत गवारी यांना मास्कची आणि वाफ घेण्याच्या यंत्रा मागचा उद्देश आवडला त्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकायांना लागलीच त्याचे वाटप केले आणि वापरण्यास आदेश दिले.
कोरोना या जंतूला तात्काळ मारण्यासाठी नाकाने तोंडाने वाफ घेणे गरजेचे आहे. पोलीस हे सतत कोरोना झोन मध्ये जात असतात तसेच सार्वजनिक ठिकाणी सततचा वावर असल्याने त्यांना कोवीड संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मास्क आणि दररोज दोन वेळा वाफ घेणे आवश्यक आहे असे वायाळ यांनी सांगितले.
विविध सामाजिक संस्थांनी मास्क आणि कोरोना किट दिल्यास पोलिसांना चांगलाच उपयोग होईल असे ताम्हाणे यांनी आवाहन केले. कोरोना काळात पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी समर्थ पो स्टेशनने सायकलद्वारे हद्दीत पेट्रोलिंग चा उपक्रम सुरु केला आहे तो स्तुत्य आहे.