कर्तुत्वाला सलाम! करोनाने वडिल आणि 3 काकांचा मृत्यू झाल्यानंतरही डाॅक्टर तरुणीची रुग्णसेवा कायम

नांदेड – राज्यात अचानक आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे नातलग हिरावले. नातलगांच्या मृत्यूच्या दु:खातून अनेकज बाहेर येत नाहीयेत. मात्र, करोनामुळे वडिल आणि तीन काकांचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्यानंतरही डाॅक्टर तरुणीने रुग्णसेवेचे वृत कायम ठेवल्याचे वृत्त समोर आले आहे. डाॅक्टर मसरत सिद्दीकी असे या युवतीचे नाव आहे.

डाॅ. मसरत नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्या डाॅक्टरांसोबतच रुग्णांना सांभाळण्याचे दुहेरी काम करतात. करोना संसर्गाने मसरत यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या वडिलांचा जीव गेला. त्यांच्या पाठोपाठ घरातील तीन काकांचेही करोनामुळे निधन झाले. मात्र तरीदेखील दु:ख बाजूला सारून मसरत यांची रुग्णसेवा सुरुच आहे. त्यांच्या या कार्याचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे. वडिलांनी दिलेल्या प्रेरणेतूनच आपण रुग्णसेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मसरत यांची आई, मोठा भाऊ, वहिनी यांनाही करोनाची बाधा झाली होती. मात्र, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कुटुंबीय आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे खचून न जाता मी वयक्तिक दु:खावर मात करू शकले. रुग्णालयातील वरिष्ठांनी धीर दिली, प्रोत्साहन दिल्याने ते माझे प्रेरणास्थान ठरले आहेत. वडिलांनी दिलेल्या प्रेरणेतून रुग्णसेवा करत आहे, असे त्या सांगतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.