पुणे – बैलगाडा शर्यतीस परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यतीस प्रांताधिकारी हे परवानगी देणार आहे. या निर्णयामुळे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याची परवानगी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस अटी व शर्तींचे पालन करून परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांना बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी आठ ते दहा आयोजकांना परवानगी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील कामाचा व्याप पाहता हे काम स्थानिक पातळीवर जलद गतीने व्हावे.
तसेच ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास लागणारा वेळ तसेच कागदपत्रांमध्ये काही त्रुटी राहिल्यास पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी यांनी शर्यतीसाठी परवानगी देण्याचे अधिकार प्रातांधिकारी यांना दिले आहेत.