तळेगाव ढमढेरे -तळेगाव ढमढेरे येथील करोना बाधितांच्या संपर्कातील बारा जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता ते निगेटिव्ह आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.
करोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महिलेच्या कुटुंबातील आणखी तिघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील बाराजणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवून सर्वांना क्वारंटाइन केले होते.
या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत; परंतु तळेगाव ढमढेरे हे गाव कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. घोरपडे यांनी केले आहे.