पुणे -लसीकरणामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट होत असल्याने लसीकरणावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे तर शहरी भागात कमी आहे. महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
लसीकरण वाहनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. मोबाइल व्हॅन माध्यमातून फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना देण्यात येईल तश्या सूचना दिल्या आहेत, काही अडचणी येत असतील तर स्थानिक निर्णय घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.