ऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता 

तळेगाव  – मावळ मतदारसंघातली राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एसआरपी, मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शनिवारी आयोजित रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. आजपर्यंतची सर्वाधिक गर्दीची ही ऐतिहासिक रॅली ठरली. त्यामुळे तळेगावात “राष्ट्रवादी पुन्हा’चीच प्रचिती आली. गाव परिसरातील पदयात्रेला काल मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आज तळेगाव स्टेशन परिसरात भव्य दुचाकी रॅली काढून शेळके यांनी जाहीर प्रचाराची सांगता केली.

तळेगाव स्टेशन येथे हनुमान मंदिरापासून ही दुचाकी रॅली सुरू झाली. हरण्येश्‍वरवाडी बुद्ध विहार, स्वराज्य नगरी, शोभानगरी, मावळ लॅंड, शहा कॉलनी, अल्टीनो कॉलनी, हरणेश्‍वर कॉलनी, साईविहार कॉलनी, वाघेला पार्क, म्हाडा कॉलनी, म्हाळसकर कॉलनी, खांडगे कॉलनी, फलकेवाडी, टेल्को कॉलनी, राजगुरव कॉलनी, तांबोळी वस्ती, विठ्ठलवाडी, स्टेशन चौक, बाजारपेठ, यशवंत नगर, तपोधाम कॉलनी, हॉस्पिटल कॉलनी, सिद्धिविनायक नगरी, विद्याविहार कॉलनी, रेनो कॉलनी, सत्यकमल कॉलनी, मनोहर नगर, स्वामी समर्थ नगर, वनश्री, आनंद नगर, इंद्रायणी कॉलनी, स्वप्ननगरी, जोशीवाडी, अंबिका पार्क, वतन नगर आदी भागातील मतदारांशी या रॅलीच्या माध्यमातून संपर्क
साधण्यात आला.

रॅलीमध्ये शेळके यांच्याबरोबर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पीडीसीसी बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई घारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, शहराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे, नगरसेविका हेमलता खळदे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम आदी मान्यवरांसह तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तसेच कॉंग्रेस आणि इतर मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील विविध भागांमधून निघालेल्या या दुचाकी रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाऊस असूनही तरुणांची गर्दी प्रचंड होती. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून सुनील शेळकेंचे औक्षण करून स्वागत केले जात होते. आकर्षक रांगोळ्यांनी मार्ग सजविण्यात आले होते. फटाक्‍यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही तळेगावात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)