चंदिगढ – पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक नेते आपापल्या सोयीनुसार पक्षांतर करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी न मिळालेले नाराज नेते पक्ष बदलत आहेत. पंजाबमधील अशाच एका एका नेत्याने 46 दिवसांत तीनदा पक्ष बदलता आहे.
पंजाबच्या हरगोविंदपूरचे कॉंग्रेस आमदार बलविंदर सिंह लड्डी यांनी शुक्रवारी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ आणि नेते फतेह जंग सिंग यांनी बलविंदर यांना पक्ष सदस्यत्व दिले. लड्डी यांचा पक्षप्रवेश म्हणजे घरवापसी असल्याचं भाजपने सांगितले.
याआधी लड्डी यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी कॉंग्रेसची साथ सोडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.. 6 दिवसांमध्येच त्यांचे मतपरिवर्तन झाले होते. त्यांनी कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. आता 11 फेब्रुवारीला त्यांनी पुन्हा कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लड्डी यांनी कॉंग्रेसच्या तिकिटावर 2017 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. डिसेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. पण भाजपने मंदीप सिंग यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेल्या लड्डी यांनी पक्ष बदलला होता.