“डायमंड प्रिन्सेस’जहाजावरुन नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरू

लंडन : करोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याच्या शक्‍यतेमुळे, जपानची राजधानी टोकियो इथे डायमंड प्रिन्सेस या जहाजावर, निरीक्षणाखाली असलेल्या आपल्या नागरिकांना, मायदेशी आणण्याची प्रक्रिया ब्रिटनने सुरू केली आहे. आज एका विशेष विमानाने ब्रिटीन आणि युरोपातले 32 जण जपानमधून रवाना झाले आहेत अशी माहिती ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. हे विमान इंग्लडच्या बॉस्कॉम्ब डाऊन लष्करी तळावर उतरल्यानंतर, विमानातल्या सर्व प्रवाशांना 14 दिवसांसाठी विशेष वैद्यकीय कार्यक्रमाअंतर्गत निरीक्षणाखाली ठेवले जाईल अशी माहितीही ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

डायमंड प्रिन्सेस या जहाजावर वास्तव्य करून, हॉंगकॉंगमध्ये उतरलेल्या एका व्यक्तीला “कोविड-19′ हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून या जहाजवरचे सर्व प्रवासी जहाजावरच निरीक्षणाखाली ठेवले होते.या प्रवाशांना “कोविड-19′ ची लागण झालेली नाही, असे स्पष्ट झाल्यानंतरच, या आठवड्यापासून त्यांना जहाजातून बाहेर जाऊ दिले जात आहे.
दरम्यान दक्षिण कोरियात “कोविड-19′ या आजाराची लागण झालेले 142 नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. करोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचेही कोरियाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सिंगापूरचाही प्रवास टाळण्याच्या मार्गदर्शक सूचना
केंद्रीय सचीव राजीव गौबा यांनी आज “कोविड-19′ संक्रमणासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या उपाय योजना तसेच पूर्व तयारीसंबंधात आढावा बैठक घेतली. नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावरच तपासणी करण्याचं या बैठकीत ठरवण्यात आले. अनावश्‍यक प्रवास टाळायच्या राष्ट्रांच्या यादीत आता सिंगापूरचाही समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. आतापर्यंत 21 हजार 805 प्रवाशांना निगराणी कक्षात ठेवण्यात आलं असून, अंदाजे चार लाख विमान प्रवासी तसंच 9 लाख 695 जलमार्ग प्रवाश्‍यांची तपासणी करण्यात आली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.