कोरोनाचा फटका! ‘या’ देशाकडून भारताची ‘रेड लिस्ट’ मध्ये नोंद; प्रवाशांना देशात येण्याची बंदी

नवी दिल्ली : भारतात थैमान घालणाऱ्या कोरोना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. रोज नव्या रुग्णांचा विक्रमी आकडा आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येत येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांपुढे असणारी आव्हाने देखील दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहेत. अशातच आता भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे.

रेड लिस्टमध्ये नोंद झाल्यामुळे आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. यासोबतच परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथे एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावे लागणार आहे.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये दिलेल्या माहितीनुसार तिथे भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचे नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता भारतीयांच्या ब्रिटन प्रवेशावर निर्बंध आले आहेत.

दरम्यान, सदर निर्णयाच्या काही तासांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पुढील आठवड्यातील नियोजित भारत दौराही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रम नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच कोरोनामुळे 1 हजार 501 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 1,38,423 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.