पर्थ : सलामीवीर सोफि डिवेझन हिच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या महिला संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात श्रीलंकेवर ७ विकेटनी विजय मिळवला. न्यूझीलंडची गोलंदाज हेली जेनसन सामन्याची मानकरी ठरली.
New Zealand Women win by 7 wickets. NZW 131/3 (17.4, Sophie Devine 75*) vs SLW 127/7 (20 ovs, Chamara Athapaththu 41, Harshitha Madavi 27, Hasini Perera 20, Hayley Jensen 3/16, Amelia Kerr 2/21) #LionessRoar #T20WorldCup pic.twitter.com/EsEQaQb1yu
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 22, 2020
श्रीलंकेने विजयासाठी दिलेले १२८ धावांचे आव्हान न्यूझीलंडने १७.४ षटकात ३ बाद १३१ धावा करत पूर्ण केले. न्यूझीलंडकडून सोफि डिवेझन हिने नाबाद ७५(५५) आणि मैडी ग्रीन हिने २९(२०) धावांची खेळी करत विजय साकारला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत कविषा दिलहारी आणि चमारी अटापट्टु यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. त्यानंतर श्रीलंकेने चमारी अटापटटु हिच्या ४१(३०), हर्षिता मानवीच्या नाबाद २७(२६) आणि हसीनी परेराच्या २०(२८) धावांच्या जोरावर २० षटकात ७ बाद १२७ अशी मजल मारली होती. न्यूझीलंडकडून हेली जेनसन हिने सर्वाधिक ३, एमेली केरने २ तर सोफि डिवेइन आणि ली लहुहु यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.